Tuesday, 31 March 2015


क्षण हळवे वाळूपरी नीसटू लागले क्षणातच....
 भावनांचे या भास ऊरूनी वीरू लागले मनातच.....
 हरवलेल्या वाटेवरची चीमणीपाखरं मैत्रीच्या घरट्यात स्थीरावली होती,
पंखात आज बळ येऊनी उडू लागले क्षणातच....
 अनोळखी होते शब्द जरी, मैत्रीच्या आपलेपणाने घातली साद....
काळ बदलूनी काळाच्या ओघात, ही हीतगूज ही हरवेल क्षणातच


 

 दूख त्याचे मज वाटे माझे, गरज सांगण्याची भासली नाही कधी...

आयूष्यभर सू:ख-दूखा:चे सहभागी असू, आज आश्वासनही देऊ लागलो क्षणातच....
 वळून बघता मैत्री दीसली, समोर बघीतले तेव्हा स्वप्ने हसली....
स्वप्नाच्यी दीशेने वाट चालू लागलो, तेव्हा वाटाही दूभंगल्या क्षणातच......

काही अटीवर त्यांची जमली घट्ट मैत्री त्यांची भेट व्हायची एकांती उत्तर रात्री ती बिचारी थकलेली
अन तो अति उत्साही त्याच्या चेहऱ्यावर तजेला
 अन भेटीची घाई तिच्या श्रमांना नव्हता अंत,फुर्सतीला उसंत तो स्वस्थ,
मस्त जणू वैरागी आनंदी संत थकली,
श्रमली तरी ती नाही म्हणत नव्हती तिच्या त्यागाची जळत होती अखंड वाती
 त्याची तर तिच्यावर हक्काची
असे सक्ती तो तिच्या बाहूत डोळे मिटून होई शांत ती
त्याचे मुके घेत संपवून टाकी मनाची खंत पूर्व उगवताच तिची लगबग वाढायची
 गालातल्या गालात मंद मंद हसायची
 तू थांब मी भेटून येते लडिवाळपणे सांगायची
 त्याच्या तेजाने दिपून लाजून चूर व्हायची
 त्याची याचना करत मागे मागे फिरायची
 थकून भागून पावले तिची वाटेतच थबकायची प्रेमाची परीक्षा त्याने किती काळ घ्यायची
 भोळी भाबडी प्रेमाखातर गर गर फिरायची इतके सारे सोसूनही कधी न थांबायची
 तिच्या बाळालाच तिची दया यायची अश्रू लपवत रोज रात्री त्यालाच कुशीत घ्यायची


 वैष्णवी लोखंडे पुणे

No comments:

Post a Comment