Friday, 8 May 2015

माझा सखा


मनातले प्रेम चेह-यावर
दिसू देत नाहीस,
डोळ्यांनी बोलतोस पण
ओठांवर येऊ देत नाहीस,
तुझा हा प्रेमाचा खेळ मी ओळखू तरी कसा
सांग ना रे सख्या तू असा कसा

फोनवर बरेच सांगतोस पण
प्रेमळ काहीच बोलत नाही
भेटीच्या तारखा ठरवतोस पण
भेटणे काही होतच नाही
आहेस माझा प्रियकर पण भासे जणू मित्र जसा
सांग ना रे सख्या तू असा कसा

तुझ्यावर केलेली कविताही तू
वाचून नुसता हसतोस,
वाटतं काहीतरी बोलशील पण
"छान" बोलून गप्प बसतोस
प्रोफेशनल तुझं वागणं तू रोमांटिक होशीलच कसा
सांग ना रे सख्या तू असा कसा

आजारी असली जरी मी तरी
तू एकदाच फोन करतोस,
त्यातही तब्येत विचारायची सोडून
काहीतरीच बडबडत बसतोस,
आहे जसा माझ्या मनातला राजा नाहीच मुळी तू तसा
सांग ना रे सख्या तू असा कसा

रागावलीच मी तर
तुला मुळीच करमत नाही,
माझ्याशी बोलल्या शिवाय
तुलाही राहवत नाही,
समजून घेते मी तुला कारण मला हि तू आवडतोस असा
सांग ना रे सख्या तू असा कसा

वैष्णवी लोखंडे
पुणे

आठवण


दूर दूर त्या वळनावरती,
भेट आपुली घडली होती..
बघता बघता दोघांचीही,
ह्रदय जणू धडधडली होती..

ह्रदय अशी धडधडली जेव्हा,
डोळ्यांचे जाहले इशारे..
तुझी पापनी अलगद उठता,
तीर मनाला भिडले सारे..

तीर मनाला भिडतान्नाही,
गंध तयाचा दरवळला..
हलके हलके श्वासही माझा,
गंधासोबत विरघळला..

विरघळताना श्वास म्हणाला,
सांग माझी तू होशील का?
चिंब भिजुनी पावसात या,
मिठीत मजला घेशील का?

मिठीत मजला घेशील जेव्हा,
धरणीला या सूर मिळे..
भेट आपुली पाहून राणी,
मंद मंद पाउस जळे..

मंद मंद पाउस जळे हा,
झुरू लागली ही धरती..
प्रीतिचा गुलमोहर फुलला,
दूर दूर...त्या वळनावरती..

Follow me on Facebook
www.fb.com/vaishnavi.lokhande.3975

वैष्णवी लोखंडे
पुणे

आयुष्य


आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघ..
खुप वेळ असेल तुझ्याकडे..
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघ..
कविता नुसत्याच नाही सुचणार…
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघ..
खुप छान वाटत रे..

सर्वात सुंदर भावनेला अनुभवुन बघ…
नुसता तडफातडफी निर्णय घेऊ नकोस..
ह्या गोष्टींचा पण विचार एकदा का होइना करून बघ..
नुसतच काय जगायच..
जिवंतपणी मरण काय असते ते अनुभवुन बघ..
एक जखम स्वतः करून बघ..

स्वताच्या पायावर कुर्हाड़ मारून बघ..
नुसत सुखच काय अनुभवायचे..
दुखाच्या सागरात एक डूबकी मारून बघ..
विरहाच्या तलवारीचे घाव सोसून बघ..
थोड्या जखमा स्वतः करून बघ..
रिकाम काय चालायच..?

आठवणीचे ओझे काय असते ते एकदा पेलुन बघ..
रडत असलेले डोळे लपवत..
एकदा हसण्याचा प्रयत्न करून बघ..
सोपं नसत रे…एकदा रडून बघ..
तुझ्या अश्रुंची चव चाखून बघ..
सांगण्याचा हेतु एवढाच की..
एकदा का होइना प्रेम करून बघ..

वैष्णवी लोखंडे
पुणे

follow me on facebook
www.fb.com/vaishnavi.lokhande.3975

जिवनाचे महत्त्व


आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात

गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom n Jerry पाहिल पाहिजे.

आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे?
एखाद्या दिवशी 1 तास द्या,
आरश्यासमोर स्वतःला
सुन्दर म्हणता आल पाहिजे.

भसाडा का असेना
आपाल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अंग हलवत
नाचणसुध्धा जमल पाहिजे.

गीतेच रस्ता योग्यच आहे
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर पण
Movie सुध्धा enjoy करता आली पाहिजे.

कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.

संध्याकाळी  मन्दिराबरोबरच
बागेत फ़िरल पाहिजे
‘फ़ुलपाखरान्च्या’ सौन्दर्याला
कधीतरी भुलल पाहिजे.

द्यायला कोनी नसल
म्हणुन काय झाल ?
एक गजरा विकत घ्या
ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या .

रात्री झोपताना मात्र
दोन मिनीटे देवाला द्या ,
एवढ्या सुन्दर जगण्यासाठी
Thanks नुसत म्हणा

वैष्णवी लोखंडे
पुणे

माझे प्पहिले प्रेम



छान होतास रे तू .....
पण जमलं नाही रे  मला
कळत होतं रे तुझं प्रेम पण...
 माझं चुकलं रे जरा ,

असा नको विचार करूस कि
मी विसरलेय तुला ,
मनात खोल कुठेतरी आठवणीमध्ये
साठवलंय रे तुला ,

आठवते मलाही आपले
ते स्वप्नांचे घर ,
तुझ्या खांद्यावरून पाहिलेली
ती पावसाची सर ,

वेळोवेळी तू दिलेली ...
माझ्या हक्काची साथ ,
अनवाणी वाळूत
चालताना माझा धरलेला हात .

हातावर रंग ठेवून .... उडाले पाखरू,
पण तू असं जगणं नको सोडूस ,
तुटलाय आपल्या घराचा वासा,
आता पुन्हा नको जोडूस

भेटली ना मी कधी तर ..
पाहून मला रडू नको वेड्या ,
कसंबसं सावरलंय मी स्वतःला ,
आता पुन्हा बांधू नको बेड्या....

आताही तुझी आसवं मला नाही बघवणार,
तुझे भिजलेले डोळे मला नाही पहावणार .
धावत येईन मी तुला सावरायला ...
स्वतःच्या प्रेमाला रडताना पाहून
स्वतःला कसं आवरणार ?

व्हायचं असेल तर ...
सगळं होईल रे ठिक ,
पण वाट नको पाहूस ...
माझ्याशिवाय चालायला शिक.... !!!!

वैष्णवी लोखंडे
पुणे

शिवभक्ती



तुफान सळसळते रक्तात..
अशी ताकद या शिवभक्तात..
सागरी लाटा उसळती काळजात..
शिवरायांचा मावळा तोच ज्याला नसे
धर्म जात..

कसली हि मंदिरे दगडांची..
जाती पातीच्या भगदडांची..
आम्ही रानभर फिरणारी वादळे..
आम्ही शिवबाची मावळे..

बाप आमचा शहाजी
आई आमची जिजाई
महाराष्ट्रात जन्मालो
हीच आमची पुण्याई

 जय जय जय
जय शिवराय

वैष्णवी लोखंडे
पुणेकर

माहेर



क्षण निरोपाचा येता
अश्रू दाटती नयनी
आठव या घराचा
भाव ओथंबले मनी

लाभले आशिष थोरांचे
कुठे ठेवू तो सौख्य-ठेवा
मागणे एक त्यांना
कधी विसर न व्हावा

सखे, मैत्र ग माझे
सदा सर्वदा सांगाती
क्षण सुखाचा, दु:खाचा
पाठी उभे माझ्यासाठी

सान पावलांनी काही
उतरती रे मनात
बंधू भगिनींचे प्रेम
सदा राहील अंतरात

मागणे एक तुम्हा
नका देऊ हो अंतर
राहूदे सदा असाच
मायेचा पाझर

वैष्णवी लोखंडे
पुणे