Friday, 24 April 2015

तुझा विरह



खास मुलांसाठी

तुझ्या विरहाचे स्वप्न.....
मला काल रात्री पडले होते...
पण ते लगेचच खरे होइल....
असे मुळीच वाटले नव्हते...

तुझ्या होकाराच्या प्रतिक्षेत...
मी सारी रात्र जागलो होतो...
तुझ्या होकारानंतर..
आईशप्पथ एक रात्र ही झोपलो नव्हतो..

तुझ्याशी बोलत असताना..
न जाणे कसा काय वेळ निघून जातो...
भूक तर दुरच...
झोपेलाही विसरून जातो.....

तुझा सुंदर चेहरा...
मला वेड लावून जातो....
तुझा काय???
संपूर्ण वेळ माझा तुझ्याकडे बघण्यात जातो...

तू सोडून जाशील...
असं स्वप्न मला एकदा पडल होतं...
इतर स्वप्न सोडून...
तेच स्वप्न खर व्हायला हवं होतं??

तुझ्या सोबत पुढील आयुष्याची..
स्वप्न पाहून झाली होती...
तू गेल्यानंतर...
ती स्वप्न अश्रुंसोबत वाहून गेली होती...

तुला एकदा पहायला मी....
कित्ती कित्ती तडफाडायचों...
उन पावसाची पर्वा न करता..
मी तिथे त्या कोप्र्यात उभा असायचो..

माझ्या प्रेमाची तुलना..
कधी कशाशीही करू नकोस..
नको करूस प्रेम पण ..
ह्या वेड्याच नाव कधी विसरु नकोस...

किती छान असत ना जर..
स्वप्नांच्या जगात राहता आल असत..
आपल्या स्वप्नाना...
तिथे तरी पूर्ण करता आलं असत.

वैष्णवी लोखंडे
पुणे

खर प्रेम


वेळात वेळ काढून वाचायला हवे खूप शिकायला मिळेल
खास प्रेमविरांसाठी
सतिश आणि छाया एकमेकावर खूप प्रेम करत होते
एकदा ते दोघे बागेमध्ये फिरायला गेले

तो तिला म्हणाला "अगं मी काहीही करेन तुझ्यासाठी
तुला हसतं पाहण्यासाठी, तुझी आस्व पुसण्यासाठी
तू फक्त हो म्हण ग..."

तिनेही लाजत म्हंटल "हो राजा मी तुझीच आहे रे,
माझ्याही श्वासाला गरज तुझीच आहे रे"

मग कसं कोण जाने, ती माझ्या मिठीत विरून गेली,
विर्घळूनच गेली, अगदी माझ्याही नकळत!!
आता मी मी राहिलो नव्हतो, न ती ती उरली होती
दोघानाही आता ओढ लग्नाची लागली होती..
मग न जाने का , नजर माझीच लागली .....

मी तिला अचानक माझ्या लग्नाची खबर सांगितली
अन थोड्याच वेळात रूम तिची गाठली लग्न पत्रीकेसोबत...

त्या भाबडीने हात तिचा कापला होता ..
मी जाण्यापूर्वी श्वास कधीच सोडला होता...
येऊन पाहून जा ग
पत्रिका आपल्याच लग्नाची आहे..
सोंग केलं होतं ग मी सारं...
फक्त तुला जळवण्यासाठी ...

आज तिच्या प्रेतासोबत माझंही प्रेत जळतंय...
जीव सोडला आहे....तरीही काळीज रडतंय..

वैष्णवी लोखंडे
पुणे

पहा ना एक छोटासा मजाक किती महाग पडला
सतिश ला

काळजाचे तुकडे


फुटलेल्या माझ्या काळजाचे,
तुकडे येऊन समेट;
एकदाच फक्त तू, मला
एकदाच येऊन भेट.

काळ सरला, ऋतु बदलले,
तरी मन तुझ्या आठवणींचा
माग काही सोडत नाही;
वारे बदलले,दिशा संपल्या,
पण तुझ्याशिवाय या मनाचा,
ठाव कुठंही जडत नाही.

निस्तेज ह्या ह्रदयाला,
तुझ्या आठवांचा सुर्य प्रकाश देते;
निष्पर्ण ह्या जीवनाला,
तुझ्या येण्याच्या आशेने पालवी देते.

तुला शपथ आहे माझ्या प्रत्येक श्वासाची;
घशात अडकलेल्या प्रत्येक घासाची;
वादळ हो, वारा हो, पाऊस बनून धाव;
एकदाच माझ्या ह्रदयावर घाल, मिलनाचा घाव;
आणि मग,

फुटलेल्या माझ्या काळजाचे,
तुकडे येऊन समेट
एकदाच फक्त तू, मला
एकदाच येऊन भेट.

वैष्णवी लोखंडे
पुणे

पुन्हा पाऊस आला


पुन्हा पाऊस आला......!
कोरडे माझे अंगण सारे
पाऊस जरी ओला,
तुझी आठवण द्यायला आज
पुन्हा पाऊस आला,

चिंब-चिंब भिजताना
आपण थेंब व्हायचो
पानावरून अलगद निसटत
पानाच्या कुशीत शिरायचो
त्या फुलांचा ओला गंधही, तूच सोबत नेला
तुझी आठवण द्यायला
आज पुन्हा पाऊस आला,

गार वारे अंगावर घेत
आपण शहारल्या वाटेवरून जायचो
तुझ्या पापण्यावरून ओघळणारे थेंब,
मी अलगद ओंजळीत घ्यायचे
"त्या" ओंजळीत थेंब "ते" च पण स्पर्श तुझा गेला,
तुझी आठवण द्यायला
आज पुन्हा पाऊस आला....

पावसाला चुकवत आपण
कितीदा वाट शोधायचो
वारा झाडांना छेडायचा
आणि पुन्हा आपण भिजायचो
सगळा पाऊस आता डोळ्यात साठलेला,
तुझी आठवण द्यायला
आज पुन्हा पाऊस आला....

दरवर्षी पाऊस येईल आणि
तुला माझी आठवण येईल
भूतकाळाच्या ओघात मी तुला
अलगद घेऊन जाईल...,
हास थोड गालात जर भाव माझा आठवला
तुझी आठवण द्यायला
आज पुन्हा पाऊस आला....

वैष्णवी लोखंडे
पुणे

मला माहीत आहे



मला माहीत आहे
तुला माझी काळजी वाटते,
त्या काळजीत प्रेम आहे
म्हणून प्रेमाची अपेक्षा करते.

मला माहीत आहे
माझ्या दिशेला वाट बघतोस,
मी जवळ आली की
दुर्लक्ष करून वाट बदलतोस.

मला माहीत आहे
माझी एवढी लायकी नसेल,
पण भिती वाटत राहते
दुसरी कुणीतरी तुझ्या मनी बसेल.

मला माहीत आहे
ही सर्व माझी कल्पना असणार,
सत्य काही वेगळेच असेल
तुझ्या मनी मी नसणार

वैष्णवी लोखंडे
पुणे

दूर हिरव्या रानात

वेदूर हिरव्या रानात ते...टुमदार घर,
छपरावर कोसळणारी पावसाची सर,
अल्लड वाऱ्यासंगे खिदळणार हि नदी,
सांग सख्या रे....येशील तू कधी?

साथ असेल तुझी तर प्रेमळ वाटतील काटे,
तुझविन सख्या रे....देखावा ही फिका वाटे
रंग त्यात सांग....भरशील कधी ?
सांग सख्या रे....येशील तू कधी?

अंगावर शहारा बेभान करेल कधी ?
दूरचा चंद्र पदरात येईल कधी?
अंगणात माझ्या सांग....चांदणं पसरणार कधी?
सांग सख्या रे....येशील तू कधी?

बोलून मला चिंब भिजवशील कधी?
नजरेत लाज माझ्या.....पाहशील कधी?
हनुवटी धरून झुकत्या पापण्यांत राहशील कधी?
सांग सख्या रे....येशील तू कधी?

शुभ्र घोड्यावर सवार राजकुमार सजला,
तो नको...निथळ मनाचा दिलदार हवा मजला,
तुज पाहण्यास बघ हि...तरसली सखी
सांग सख्या रे....येशील तू कधी?

वैष्णवी लोखंडे
पुणे

हृदयस्पश्री कथा


वेळात वेळ काढून वाचायला हवे मन आनंदी करणारे संवाद
  आज ते निशा आणि सागर  खुश होते....असणारंच ना?....कारण आज ते खूप दिवसांनी एकमेकांना भेटणार होते.

भेटायचे म्हणून आज ती केस मोकळेच सोडून आली होती....कारण त्याला आवडायचे तिचे मोकळे सोडलेले केस.
त्याला ती जशी आहे तशी आवडायची म्हणून ती सुद्धा तशीच आली होती.....न नटता थटता...एकदम साधी...
त्याने तिला लांबूनच येताना पहिले.
दोघांनाही एकदम आनंदाचे झरे फुटले.....

दोघेही बीचवर गेले बसायला....
दोघांनीही खूप गप्पा मारल्या....
समुद्रावर दोघेही जीव एकदम सुखात बसले होते.

"अथांग सागराची लाट,
दोघांचे हातामध्ये हात,
डोळ्याच्या समईत स्वप्नांची वात,
स्पर्शाची उब अन....सोबत थंड वाऱ्याची साथ"

मधेच तिच्या लक्षात आले कि,तो तिच्याकडेच पाहत बसलाय....तिला लाजायला झाले,
म्हणाली,
"ये जाणा.....माझ्याकडे का पाहतोयस असा.....समोर बघ ना....समुद्र बघ कसा फेसाळलाय....मस्त दिसतोय"
"अगं पण त्याच्यापेक्षा मी आता जो पाहतोय तो समुद्र मस्त दिसतोय."
तिला अजून पाणी पाणी व्हायला झालं....तरीही ती म्हणाली...."बस हा बस झालं..."
तो म्हणाला,"ये ऐक ना....गोव्याचे समुद्र कि नाही मस्त आहेत....शांत एकदम....एकदम......"
"बस बस.....पुरे झाले "गोवा पुराण"......गोव्याचे बीच असे होते...गोव्याचेबीच तसे होते....." तिने त्याचे वाक्य मधेच तोडले.
तो हिरमुसला बिचारा आणि सांगितल्या प्रमाणे समोर समुद्राकडे पाहू लागला.
तिच्या लक्षात आले ते आणि तिने त्याच्या खांद्यावर डोके टेकवले...
म्हणाली,
"तुज्या खांद्यावर डोके ठेवले न कि सगळा त्रास विसरायला होतो......खूप खूप आयुष्य जगावसं वाटतं"
मग काय?......गेला त्याचा सगळा राग.....
ती मधेच शांत झाली,
"माझे बाबा नाही तयार होणार रे आपल्या लग्नाला.....आपणथांबवू हे सगळे...."
"अगं मी समजावेन त्यांना...त्यांना तुला सुखातंच बघायचीय ना.....मी करेन त्यांच्या सगळया इच्छा पूर्ण.जरूर ऐकतील ते"
आणि तो तिला समजावून सांगू लागला....सगळे ऐकून मग ती थोडी शांत झाली....
तिला समजावून मग तो तिच्याकडे थोडीशी पाठ करून बसला,
तिच्या लक्षात आले ते....तिने त्याची हनुवटी धरून त्याचा चेहरा स्वतःकडे फिरवला,
त्याचे डोळे पाणावलेले होते,
म्हणाली,"अरे रडतोस काय वेड्या.....काय झाले?
म्हणाला,"काय नाही गं....खरंच तुजे बाबा त्या नाही झाले तर?....हा विचार करत होतो..तेव्हा जो एकटेपणा वाटेल ना तो जाणवत होतो"
"अरे तू पण ना वेडा आहेस....मंद.....मी कुठे जात नाहीयेय.....मी फक्त तुजीच आहे....फक्त तुझीच"
असे बोलून तिने त्याच्या गालावर चुंबन घेतले आणि म्हणाली,"माझे तुझ्यावर खूप खूप खूप खूप.......खूप प्रेम आहे".
तो म्हणाला,
"काय म्हणालीस?मला ऐकायला नाही आलं....कालपासूनकमी ऐकायला येतंय...
आणि
आता गालावर काय केलंस??????माझे सगळे सेन्सर काल पासून बंद पडलेयत...काही जाणवतच नाहीयेय....पुन्हा कर बघू".

लाजली ती...म्हणाली..."हो का?......बावळट.....

वैष्णवी लोखंडे
पुणे


खास प्रेमविरांसाठी

मी तिला विचारले किती गं करतेस माझ्यावर प्रेम,
  हसत म्हणाली माझ्या नजरेला जरा वाचत जा...
 
  मी विचारले किती गं असे भेटायचे चोरून चोरून,
  ती म्हणाली प्रेमात थोडासा धीर धरत जा...
 
  मी म्हणालो आता मला तुझ्या साथीची गरज आहे,
  ती म्हणाली त्यासाठी देवासमोर रोज हात जोडत जा...
 
  मी म्हणालो खूप ओझं झालंय एकाकीचं आता,
  ती म्हणाली अरे वेड्या मग आठवणी थोडंसं रडत जा...
 
  मी म्हणालो अरे पापण्या ओल्या होतात विरहात तुझ्या,
  ती म्हणाली मुखवटे घालून थोडंसं हसत जा...
 
  मी म्हणालो ऋतू सुद्धा माझ्यावर हसतो आहे,
  ती म्हणाली अरे मग एक छानसी गझल ऐकत जा...
 
  मी विचारलं असतेस कुठे सध्या तू,
  तेव्हा मात्र ती म्हणाली माझ्या श्वासांना तुझ्यातच कुठेतरी शोधत जा..
 
  मी विचारलं हि कुठली रीत तुझी प्रेम करण्याची,
  ती म्हणाली अरे प्रेमात कधी असाही एकमेव अनुभव घेत जा..
 
  मी विचारलं आता किती वाट बघायची तुझी सखे,
  ती म्हणाली नेहमीच तू तरसवतोस मला आता तू ही तरसून बघत जा..

वैष्णवी लोखंडे
पुणे


हसता हसता डोळे अलगद भरूनही येतील
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरून
कावरबावर होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
एका सारखेच दिसू लागतील बघता बघता
अवती भवती तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणीच नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं काहीच नाही
कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही

मोबाईल  वाजण्याआधी तो वाजल्या सारखा वाटेल
जुनाच काढून sms वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली उगाचच जड जाईल श्वास
घाबरून बिबरुन जाण्यासारखं काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत डोळे पुसत पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे
सांगून द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही

कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही

वैष्णवी लोखंडे
पुणे

Wednesday, 1 April 2015

एक दिवस असा होता की........



एक दिवस असा होता की........
कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं
स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं


एक दिवस असा होता की
कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं


एक दिवस असा होता की
कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं


एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
पण माझं यातनामय जीवन त्याला कसं सांगायचं
मग काय, विहिरीतील कासव बघायचं

आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं


आज दिवस असा आहे की
मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं


आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं
का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं


मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं! *


तेच तेच क्षण आठवतात


तेच तेच क्षण आठवतात





विसरेन विसरेन म्हणत तेच तेच क्षण आठवतात



का ती आठवते? अन मन होते उदास
 नसण्याने तिच्या होतो वेडेपणाचा आभास
 वेड्यात काढतात मित्र अन नाव मला ठेवतात
 पण काय करू मी
 विसरेन विसरेन म्हणततेच तेच क्षण आठवतात .................





का ती आठवते? अन हृदय हि कोमेजते
 न दिसणाऱ्या तिची हृदयात छवी उमटते
 अशा छवीला पाहून मरतो मी एकांतात
 पण काय करू मी
 विसरेन विसरेन म्हणत तेच तेच क्षण आठवतात .................





का ती आठवते? अन हास्याची रांगोळी होते
रंगात आलेल्या मैफिलीला बेरांगाची साथ मिळते
 कधी न पडलेली अभद्र स्वप्न हि आत्ताच दिसू लागतात
 पण काय करू मी
विसरेन विसरेन म्हणततेच तेच क्षण आठवतात .................





का ती आठवते? अन होते निराशा आठवणीत तिच्या
 फक्त अश्रुंचाच ओलावाअश्रू हि सुकतात
 अन डोळे माझे थकतात
पण काय करू मी

 विसरेन विसरेन म्हणततेच तेच क्षण आठवतात .................

विसरेन विसरेन म्हणततेच तेच क्षण आठवतात .................


आता नाही आठवायचं...


आता नाही आठवायचं...



मागे वळुन पुन्हा,आता नाही बघायचं...
विसरलेल्या आठवणींना,
आता नाही आठवायचं...



चुकार हळव्या क्षणात,
आता नाही फसायचं...
अपेक्षांचे ओझे आता,
मनावर नाही बाळगायच...





नागमोडी वळणावर आता,
नाही जास्त रेंगाळायचं...
निसरड्या वाटेवर आता,
नाही आपण घसरायचं...





स्वतःच्या हाताने आता,
स्वतःला सावरायचं...
नी स्वतःचे आयुष्य,
स्वतःच आपण घडवायचं साधं सोपं आयुष्य

साधं सोपं जगायचंहसावंसं वाटलं तर
 हसायचंरडावंसं वाटलं तर रडायचंजसं बोलतो
तसं नेहमीवागायला थोडंच हवंप्रत्येक वागण्याचं
 कारणसांगायला थोडंच हवंज्यांना सांगायचं
त्यांना सांगायचंज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!

मनात जे जे येतं ते तेकरून बघितलं पाहिजे
आपणजसं जगावं वाटतं तसंचजगून बघितलं पाहिजे
 आपणकरावंसं वाटेल ते करायचंजगावंसं वाटेल तसं जगायचं...


मी नाही म्हणत....











मी नाही म्हणत....तू फक्त माझी असावी...
 पण माझ्या जीवनात मात्र तुझ्या खेरीज कुणी नसाव...
मी नाही म्हणत....
तू मलाच आठवावं..
पण तू मात्र सदैव माझ्या स्मरणात रहाव..

मी नाही म्हणत....
तू मला मनात ठेवाव...
पण माझ्या मनी मात्र तूच वसाव...

मी नाही म्हणत....
तू माझ्या साठी रडावं....
पण माझी पापणी मात्र तुझ्याच साठी भिजाव....

मी नाही म्हणत....
तू मला प्रेम कराव...
पण कधी तरी तुलाही माझ्याच सारख प्रेम व्हाव...

मी नाही म्हणत....
तू कधी हसू नये....
पण माझ्यासाठी हसण्याचे कारण मात्र तूच असाव...

मी नाही म्हणत....
तू मला भेटाव..
पण माझ्या साठी ती भेट मला सुखी करून जाव...

मी नाही म्हणत....
कधी तू माझ्या साठी कविता रचावी...
पण माझी लेखणी तुझ्याच आठवणीत वळावी....

मी नाही म्हणत....
कधी तुला मीच दिसाव....
पण माझे, डोळे बंद होताच स्मरणात तुझीच चित्र दिसावीत...

मी नाही म्हणत....
कधी तुझी भावना तुझ्या पासन दूर जावी..
पण दुख होईल मला, जर माझी भावना तुला न कळली....

मी नाही म्हणत....
तुझ जगन माझ्यासाठी बदलाव...
पण माझ स्वप्न, जगन माझ हे तुझ्या कुशीत पूर्ण व्हाव...

मी नाही म्हणत....
माझ्या भावनान सोबत खेळू नको...
पण माझ तुझ्यावर खरच प्रेम आहे हे तू विसरू नकोस...

मी एवढच म्हणते....
माझ्या प्रेमाची जाणीव व्हावी....
अन पुढच्या जन्मी तरी तु माझी अन मी तुझा बनून याव...

मी एवढच म्हणते....
माझी शेवटची इच्छा तू पूर्ण करावी...
या जन्मी नाही तर पुढल्या जन्मी तरी आपली भेट व्हावी..

नको ग जाऊ सोडून मला


नको ग जाऊ सोडून मला







नको ग जाऊ सोडून मला .............

कसे कसे च होतंय मला ....असंख्य वेदना होतात हृदयला ...

कसले वेड लावून ठेवलय ग हे माज्या जीवाला ...

असे मला एकटे सोडून जाणे पटतंय का ग तुज्या मनाला ...





नको न ग जाऊ सोडून मला ..........

तुज्या असण्याने जगण्याला अर्थ होता ..

मला रडवण्याचा हा तुज खेळ का होता ...

तुज्या नसण्याने जगण्याला अर्थ नव्हता..

तुला हे समजावण्याचा माझा व्यर्थ प्रयत्न होता ...




नको ग जाऊ सोडून मला ......

कसे सांगणार त्या स्वप्नांना ..

वाट पाहणाऱ्या डोळ्यांना ...

कसे आठवणार त्या दिवसांना ...

एकत्र घालवलेल्या क्षणांना ...




नको ग जाऊ सोडून मला .........

येशील का ग परत माज्यासाठी ...

अतुरोलय मी तुजीच रे शब्द ऐकण्यासाठी ...

ये ग अशी मिठीत ...

जाणार्या या क्षणांना ठेवलाय मुठीत ...

जाणारे पावले gud bye

शब्द नकोयत आठवणीत ...




नको ग जाऊ सोडून मला ........

कोणाची ग नजर लागलीय माज्या नशिबाला ..

खरचं का ग तू नाही येऊ शकत माज्या साथीला ...

तूच हवी आहेस जगण्यासाठी प्रतेक श्वासाला ...

तूच हवी आहेस मरण्यासाठी शेवटच्या श्वासाला ...

नको ग जाऊ सोडून मला ...............

तु असती तर..


तु असती तर...








तु असती तर....

फार तर तुझ्यासोबत भांडलो असतो.... खुप

भांडता भांडता अचानक

काहितरी भयान शांतता झाली असती

एखाद्या खोल दरीत आवाज दिल्यावर

परत यावा...! अशी माझी नजर

तुझ्या नजरेला स्पर्शुन परत आली असती

अन् मग हळुच.... तुझ्या तळहातांवर

माझ्या ओठांनी चुंबन फुले ठेवली असती....

अन् मग नकळत.... आपलं भांडण मिटलं असतं....




तु असती तर....

आयुष्यात फार तर एक जीवन असतं

आताही आहे... पण जीव तर तुच घेऊन गेलीस

आता फक्त एक वन राहिलेलं...

संपतच नाही ....चालतो आहे कधीचा

सुर्यही उगतो तुझाच दिवस घेऊन

रात्रही माझी नाही...चंद्रही माझा नाही...

आहे माझा फक्त ... काळोख प्रत्येक रात्रीचा...




तु असती तर...

फार तर एक घरटं आपलं असतं...

त्या घरट्यामध्ये आपल्या स्वप्नांचं

तोरण मी बांधलं असतं

पण तु नाही म्हणुन काय झालं...

घरटं तर अजुनही तसच आहे ह्या मनामध्ये...

बस एक पाखरु वाट चुकून

कुठेतरी उडून गेलं... मध्येच...!!

अन् मी ही विसरून गेलो

माझ्याच घरट्याचं तुटलेलं तोरण पाहुन ...

कि हे माझचं आहे म्हणुन....

तु असती तर...

फार तर मी स्वत:ला विसरलो नसतो...


तूला तर माहीत ही होते


तूला तर माहीत ही होते









तूला तर माहीत ही होते
अनं तूला कळले देखील होते
कितींदा ही मी चिडले अोरडले
तरीही माझ्या मनात मात्र खूप प्रेम होते

हो रागात म्हणाले ही होते
जा तू बोलू नकोस मला
ही झाली माझी चुक मान्य होती मला

नंतर मी ही बोलण्याचा फार प्रयत्न केला तूला
परंतू माझ्याशी बोलणे मनात नह्वते तेव्हा तूला
का काहीच कळले नाही मला
इतका अबोला धरून सोडून गेलास तू मला

काय,लिहु मी हया आईच्या मायेवर....


काय,लिहु मी हया आईच्या मायेवर....





काय,लिहु मी हया आईच्या मायेवर....

त्रास हा आपल्या जन्माचा होतो हा आईवर,

खोट वाटत असेल तर,विचारा तुमच्या आईला,

किती झाला त्रास तुमच्या जन्माचा........







नाही सोडले तिने इतरांसारखे नदीच्या किना-यावर,

घेऊनी कडेवर, खांदयावर,

शिकवल कस चालायच हया,आयुष्याच्या वाटेवर,

बोलली तु जा,आहे मी पाठीशी, या जीवनाच्या वाटेवर......







धरुनी हात , शिकवली अ-आ-ई पानावर,

केली मस्ती-आली सुस्ती तर चटके दिले या पाठीवर,

जरी चटके दिले तिने पाठीवर तरी , त्रास होतो तिलाच ,

आहे स्वप्न तिचे, माझ्या मुलाने नाव कोराव जगाच्या पाठीवर.....







पण,झालो आपण मोठे की फ़ुटतात शिंग-डोक्यावर,

नाही राहत आपल प्रेम आपल्या आई-वडिलांवर,

राहते ते फ़्कत आजुबाजुच्या आणि कालेजच्या मुलींवर,

लाज वाटते कोणी बोलेल तु फ़िरतो अजुन आई-वडिलांबरोबर,

पण,नाही त्रास होत त्या आईला या मुलाच्या वागण्यावर......







दिल लग्न लावुन,त्यांनी मला माझ्या निवडीवर,

वाटल,मला ते चुक आणि मी बरोबर या माझ्या निर्णयावर,

संसार करुनी दोघ जाऊ या सुरळीत जीवनावर,

पण,सगळ विसकटल जीवन ही माझ्या गणितावर.....







बाळा जातो तर जा,पण जा काळा-वेळेबरोबर,

पण,लक्ष नाही दिले मी तिच्या शब्दावर,

होतो,आता पश्चाताप केलेल्या क्रुत्यावर,

काय,फ़ायदा आता रडुनी तिच्या आठवणीवर,

काय,लिहु मी हया आईच्या मायेवर.....




रंग माझ्याप्रेमाचे

रंग माझ्याप्रेमचे, आहेत तरी कोणते,
माय माझी जवळ घेऊन, प्रेमाने मला सांगते,

सौख्य तिचे आणि माझे, आहे फार काळा पुर्वीचे,
कल्पनाविलास न्हवे हा, हे नाते निर्मळ प्रितीचे,
चिंब ओलं करणार्‍या, पावसाच्या सरींचे,
मनात गारवा निर्माण करणार्‍या, अमृतमय धारांचे.

मेघांच्या गप्पा-तप्पांतुन, हिचा जन्मं होई,
क्षणात मज भेटावयास, ही पृथ्विवर धावत येई,
स्पर्शसुखाने तिच्या, सारे अंग शहारुन जाई,
काय सांगू तुम्हास मी, या प्रणयाची नवलाई.

मिलनाची या साक्ष द्यायला, ईन्द्रधनुष्य सज्ज होइ,
फुलवुनी पिसारा नाचताना, मोरासही नवा जोम येई,
प्रक्षुबध होउनी वारा, शरीरास झोंबुन जाई,
सारी सृष्टी आम्हा दोघांकडे, हसतमुखाने पाही.

थंडगार तुषार तिचे, ओठांनी माझ्या टिपले,
वेड्यासारखी बरसू लागली, तिचेही देहभान हरपले,
खोल सुप्त विरहाचे, दुःख क्षणात संपले,
पृथेवर माझ्याकरिता जणु, देव-देवताच अवतरले.

असं हे माझ्या प्रेमाचं रहस्य, आईने अचुक ओळखलं,
पण आम्हा दोघांना एकत्र, तिने कधी बरं बघितलं