Friday, 24 April 2015



हसता हसता डोळे अलगद भरूनही येतील
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरून
कावरबावर होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
एका सारखेच दिसू लागतील बघता बघता
अवती भवती तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणीच नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं काहीच नाही
कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही

मोबाईल  वाजण्याआधी तो वाजल्या सारखा वाटेल
जुनाच काढून sms वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली उगाचच जड जाईल श्वास
घाबरून बिबरुन जाण्यासारखं काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत डोळे पुसत पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे
सांगून द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही

कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही

वैष्णवी लोखंडे
पुणे

No comments:

Post a Comment