Friday, 24 April 2015

काळजाचे तुकडे


फुटलेल्या माझ्या काळजाचे,
तुकडे येऊन समेट;
एकदाच फक्त तू, मला
एकदाच येऊन भेट.

काळ सरला, ऋतु बदलले,
तरी मन तुझ्या आठवणींचा
माग काही सोडत नाही;
वारे बदलले,दिशा संपल्या,
पण तुझ्याशिवाय या मनाचा,
ठाव कुठंही जडत नाही.

निस्तेज ह्या ह्रदयाला,
तुझ्या आठवांचा सुर्य प्रकाश देते;
निष्पर्ण ह्या जीवनाला,
तुझ्या येण्याच्या आशेने पालवी देते.

तुला शपथ आहे माझ्या प्रत्येक श्वासाची;
घशात अडकलेल्या प्रत्येक घासाची;
वादळ हो, वारा हो, पाऊस बनून धाव;
एकदाच माझ्या ह्रदयावर घाल, मिलनाचा घाव;
आणि मग,

फुटलेल्या माझ्या काळजाचे,
तुकडे येऊन समेट
एकदाच फक्त तू, मला
एकदाच येऊन भेट.

वैष्णवी लोखंडे
पुणे

No comments:

Post a Comment